जल जीवन मिशन जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्या विकास समिती द्वारा संचालित सुंदराबाई गोपालस्वामी बाॅईज आणी गर्ल्स हायस्कूल चा वसंत बादल सलामे माध्यमिक गटातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. २१००० हजार रुपयांचे रोख पारितोषिक त्याला प्राप्त झाले आहे.
वसंत हा वर्ग ९ चा विद्यार्थी असुन अभ्यासातील उल्लेखनीय प्रगतीसोबतच चित्रकला, नक्षीकाम, मातीकाम आणी क्रीडाक्षेत्रात देखील त्याचा नावलौकिक आहे अत्यंत विनयशील स्वभावाचा वसंत कायमच शिक्षक आणी विद्यार्थी प्रीय असुन त्याने काढलेले चित्रे हा सर्वांच्या औत्सुक्याचा आणी प्रशंसेचा विषय असतो.
वसंतच्या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शरदचंद्र अडोणी तथा संचालक मंडळ सदस्य विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास अढाऊ, पर्यवेक्षक शिशिर देशपांडे,कला शिक्षक आकाश चव्हाण आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.