रोजची पायपीट त्यातून होणारी दमछाक आणी उद्याच्या चिंतेत आजचा दिवस, कशासाठी..? तर पाण्यासाठी.!
मेळघाटातील घरां-घरांतील ही कहाणी तशी जुनीच
धारणी तालुक्यामधील धरणमहू गावात राहणाऱ्या मुन्नी हरीराम धुर्वे या महिलेची कहाणी सुध्दा अशीच पण जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत जल जीवन मिशन मधुन गावामधे पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आणी कहाणी थोडी बदलली आता घरातच नळ जोडणी मिळाल्याने नियमित पाणी मिळु लागले त्यामुळे रोजची पायपीट त्यातून होणारी दमछाक थांबली. उद्याच्या पाण्यासाठीची चिंता मिटली.